विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान,खडकी शेतशिवारातील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

अथक परिश्रमानंतर गावकर्यांच्या साहाय्याने विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना आज दि 9 नोव्हेम्बर रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान खडकी येथील मोहन मधुकर झोटिंग यांच्या शेतात घडली.
अत्यल्प पाऊस पडल्याने जंगल शिवारात पशू, पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले. परिणामी पाण्याच्या शोधार्थ प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रोहीच्या पिल्लाबाबतही असेच घडले.आज 9 नोव्हेम्बर रोजी एक वर्षीय पिल्लू पाण्याच्या शोधार्थ खडकी शिवारातील मोहन मधुकर झोटिंग यांच्या शेतात पोहोचले. सकाळी 9 वाजेच्या दरम्यान पिल्लू विहिरीत पडले असावे. सकाळी नेहमीप्रमाणे मोहन झोटिंग शेतात गेले असता, विहिरीतील पिल्लू त्यांच्या दृष्टीस पडले.ही माहिती गावातील हर्षल झोटिंग, प्रवीण,झोटिंग,राजू रघाताटे,प्रवीण चौधरी,वैभव केराम यांना माहित होताच यांनी विहिरीत उतरून त्या रोहिच्या पिल्याला बाहेर काढून जीवदान दिले,ह्यावेळी अनेक गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.