वऱ्हाडी ठेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात मोठ्या थाटात संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज माझ्या वऱ्हाडी ठेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात मोठ्या थाटात संपन्न झाले, मान्यवरांच्या उपस्थितीत व साहित्यिक सारस्वतांच्या साक्षीने हा सोहळा दिमाखदार झाला, कार्यक्रमाचे आयोजन श्री संदीपजी चिचाटे सर,व डॉ रत्ना ताई नगरे यांनी व त्यांच्या संपूर्ण ग्रुपने केले होते, कार्यक्रमात कवी प्रा नितीनजी देशमुख यांच्या गझलने उपस्थित रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला, अनेक ग्रुप ने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगत आणली .
मी प्रदिप पं कडू आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
सर्वाना राजभाषा मराठी महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
।।जय शिवराय।।।।जय महाराष्ट्र।।
आपलाच
प्रदिप पं कडू