
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक ०१/०७/२०२२ रोज शुक्रवार आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती राळेगाव येथे कृषी दिनाचे औचित्य साधून राळेगाव तालुक्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबणाऱ्या व शासकीय अनुदातून मिळालेल्या योजनेचा उत्तम प्रकारे लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या कर्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मडावी साहेब (BDO)पंचायत समिती राळेगाव प्रमुख पाहुणे श्री. राजू ताकसांडे तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राळेगाव तसेच कृषी विभाग पं. समिती राळेगाव येथील श्री.राहुल वंजारी , अनुदानाचा पूर्ण उपयोग करून शेती करण्याऱ्या शेतकरी श्री.लिहितकर व रावेरी येथील ड्रॅगन फ्रुट ची लागवड करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून विवेक ज्ञानेश्वरराव उंडे यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते व त्यांचा सत्कार करण्यात आला .या कर्यक्रमाला लाभलेले पंचायत समिती नरेगा विभागाचे प्रमुख श्री.दिनेश वाईकर,ललित तराळ,आशिष गोपतवार व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
