आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण या प्रकरणी (राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथील कोलाम समाज यांच्या वतीने राळेगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले)


राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)


यवतमाळ जिल्ह्यामधील झरी या तालुक्यातील वरपोड येथील आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची अनुसूचित जाती व जमातीच्या त्‍याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले .पांढरकवडा व संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्या वतीने वाघाची शिकार प्रकरणात गाव वरपोड तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी कोलाम जमातीच्या वस्तीवर तीनशे वनसंरक्षण अधिकार अधिकारी व कर्मचारी आणि शंभर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने संशयित पुरुषांना पकडण्याच्या उद्देशाने कारवाई करण्यात आली. परंतु या कार्यवाहीत वरपोड गावातील एकूण आदिवासी कोलाम महिलांना विनाकारण अमानुष मारहाण करण्यात आली .गर्भवती महिला व एक अल्पवयीन मुलगी होती .त्यांना सुद्धा व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकार्‍यांनी यांनी बेदम मारहाण केली .अनुसूचित क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासी कोलाम समाजात वाघाला कुलदैवत वाघोबा या नावाने संबोधले जाते त्यांनी पारंपरिक पध्दती नुसार पूजा केली जाते .वाघाला मारल्या जात नाही .तसे असते तर टिपेश्वर अभयारण्यातील एकही वाघ शिल्लक राहिला नसता. विनाकारण आदिवासी कोलाम समाजातील महिलांना मारहाण करण्यात आली. वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत दाखल करावी. अशी मागणी राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथील कोलाम समाज यांच्या वतीने राळेगाव तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आली.या वेळी निवेदन देताना. मा.अमित सूर्यभान ढोबळे, मंगेश मा.आत्राम.सुरेश जुनघरे, अनिल निंबादेवी, आकाश ढोबळे, मोहन जुनघरे, विशाल सुकली, काशिनाथ टेकाम मुकेश आत्राम, आदी कोलाम समाज उपस्थित होते..