
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापनेला २४ मार्च २०२२ ला तीन वर्षे पूर्ण झाले असून राळेगांव येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचा तृतिय वर्धापन दिन ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे रुग्णांना फळ वाटप करुन साजरा करण्यात आला .
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २४ मार्च २०१९ रोजी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे या पक्षाची वैचारिक प्रणाली व संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षवादी, पक्ष असून या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला तीन वर्षे पूर्ण झाले असल्याने राळेगांव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वर्धापन दिंन साजरा करण्यात आला असून वर्धापन दिनानिमित्य ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. विकास मुन, वैद्यकिय अधिकारी , तालुक्याचे सल्लागार प्रमुख डॉ . ओमप्रकाश फुलमाळी , महासचिव प्रकाश कळमकर , शहर अध्यक्ष दीपक आटे , युवा अध्यक्ष घनश्याम फुलमाळी , लोकेश दिवे , उपाध्यक्ष धनराज लाकडे , उपाध्यक्ष राहुल उमरे , प्रकाश मुन , प्रभाकर भगत, धनराज लढी , संतोष घनमोडे , भगवान तागडे , अजय दारुंडे , मनोहर सावध , रमेश पाटील , देविदास खैरे , आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
