
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर.
राळेगाव तालुक्यातील उंदरी व जागजई येथे कोरोणा तपासणी करण्यात आली आहे , कोरोणा सारख्या भयानक रोगापासून दुर राहण्यासाठी व गावाच्या हितासाठी उंदरी व जागजई येथे जनजागृती करून कोरोणा तपासणी करण्यात आली उंदरी येथे अॅटीजन 75 व आर टी पीसीआर 45 तर जागजई येथे अॅटीजन 25 व आर टी पीसीआर 21 असे दोन्ही गावामुळे 166 लोकांनी तपासणी केली यावेळी वरध येथील लॅबंटेकनीश बेहेरे साहेब, तलाठी तिरणकर साहेब, उंदरी येथील सचिव संजय झिलपे, जागजई येथील सचिव देवानंद अंभोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हिमतराव काळे,उंदरी येथील पोलीस पाटील नालमवार, जागजई येथील पोलिस पाटील नंदकिशोर टापरे, आशा स्वयंसेविका, सरपंच, उपसरपंच, कोतवाल, इत्यादी हजर होते गावातील जनतेने चागल्या पद्धतीने सहकार्य केले.
