
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव नगरपंचायतीच्या १७ प्रभागापैकी १४ प्रभागांचे मतदान प्रक्रिया पार पडली असून राळेगांव नगरपंचायत निवडणुकीतील १७ प्रभागापैकी ३ ओ.बी.सी आरक्षित प्रभागाचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे आदेशाने त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे.
त्यानुसार ३ प्रभागातील आरक्षण निवडणूक आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचे अध्यक्षतेखाली काढण्यात आले यामध्ये प्रभाग क्र ११ व ४ प्रभाग क्र मध्ये महीला व प्रभाग क्र ८ मध्ये सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण लहान मुलांचे हस्ते चिठ्ठी द्वारे काढण्यात आले
२१ डिसेंबर रोजी राळेगांव नगरपंचायतच्या १७ पैकी १४ प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले आहे यावेळी राहिलेल्या चार ३ ओ.बी.सी आरक्षित होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या ३ जागाचे ओ.बी.सी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारण मधून निवडणूक येत्या १८ जानेवारी २०२२ रोजी होत आहे.यासाठी आज या ३ प्रभागातील महिलांचे आरक्षण सोडत तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे तर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित काढण्यात आले. तीन प्रभागाच्या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक ४ व ११ मध्ये सर्वसाधारण महीला तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वसाधारण व्यक्तीचे आरक्षण आले. या तीन जागांसाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार असून या तीन प्रभागातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
