आष्टा ते ईचोरा रस्त्या कधी दुरुस्ती होइल,आमदार खासदार यांना निवेदन देऊन त्यांचें दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील आष्टा ते इचोरा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आष्टा ते इचोर रस्ता तीन किलोमीटर आहे तरी रोडचे काम होत नाही
रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण करण्यात आले नाही रस्ता तयार झाला तेव्हापासुन अनेक निवडणुका झाल्या आहे अनेक़ लोकप्रतिनीधी निवडुन गेले आहे अनेकदा लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहे
तर लोकप्रतिनीधी जेव्हा कधी गावात निवडणुकीच्या प्रचारासाठी येतात तेव्हा त्यांना ईचोर या गावातील नागरिक रस्त्याविषयी माहीती विचारतात तर ते सांगतात कि हो रस्ता होणार आहे होईल त्यानंतर अनेक वर्ष लोटुन जातात आणि पुन्हा विचारल्यास तेच उत्तर राहतात पण रस्ता होत नाही रस्ताकडे लक्ष द्यायला तयार नाही असे तेथील परिसरातील नागरिक सांगताना दिसत आहे त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे.कारण तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे
त्यामुळे लोकप्रतिनिधींनी रस्त्याकडे लक्ष देवून रस्ता बनवून देण्याची मागणी ईचारा येथील किरण गाडगे व गावकरी मंडळी करत आहे.