राळेगाव तालुक्यातील धानोरा मोफत कोरोना चाचणी:उपसरपंच विशाल येनोरकर


राळेगाव तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर

दि. १२/५/२०२१ रोजी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.
मागील वर्षी शहरांपर्यंत सीमित असणारा कोरोना यावर्षी खेडेगावात घराघरात पोहोचला आहे. कित्येक घरात ताप,सर्दी,खोकला असे रुग्ण आढळून येत आहे.
कुठलाही ताप अंगावर न काढता लगेच आपण कोरोनाची टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की लगेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे.
बरेच रुग्ण ताप आला की तात्पुरत्या गोळ्या घेऊन ताप अंगावर काढतांना दिसत आहे. त्यामुळे रुग्णांची स्थिती हाताबाहेर जात आहे.
रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला की त्याला कोरोनाची ट्रीटमेंट अति आवश्यक असते. सात ते आठ दिवसांनंतर कोरोना फुफ्फुसा मध्ये जाऊन रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ शकते व परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. वेळ न करता उपचार घेतल्यास कोरोना रूग्ण शंभर टक्के बरा होऊ शकतो. ताप आल्यास किंवा कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळल्यास मनात कुठलीही भीती न ठेवता त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन कोरोना चाचणी करावी व वेळीच उपचार घ्यावे
असे आवान धानोरा येथील उपसरपंच विशाल येनोरकर यांनी सांगितले .