श्री प्रमोदराव बा. आंबटकर यांची महसूल व वनविभाग मार्फत “उत्कृष्ट पोलीस” पाटील म्हणून राळेगाव तालुका स्तरावर निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


महसूलदिनांचे ” औचित्य साधून महा. राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना राळेगाव

संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि मौजा दापोरी कासार येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री प्रमोदराव बा. आंबटकर यांची महसूल व वनविभाग मार्फत “उत्कृष्ट पोलीस” पाटील म्हणूनराळेगाव तालुका स्तरावर निवड करून त्यांना “उत्कृष्ट पोलीस पाटील ” म्हणून मा. श्री काळे साहेब उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव व मा. श्री डॉ. कानडजे साहेब तहसीलदार राळेगाव यांचा उपस्थितीत मा. श्री. बदकी साहेब ना. तहसीलदार यांचे हस्ते राळेगाव तालुका स्तरावरील प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यात आले त्याबद्दल मा. उपविभागीय अधिकारी साहेब. मा. तहसीलदार साहेब. सर्व महसूल अधिकारी आणि मा. ठाणेदार साहेब राळेगाव यांचे आभार मानले.