
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय संविधान व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.संविधाना बाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी ग्रामसेवक सोनुले साहेब, उपसरपंच शंकरभाऊ वरघट, ग्रा.पं. सदस्य रवींद्रजी कन्नाके, ग्रा.पं. सदस्य नारायणराव येरगुडे, सुरेशराव गोवारदिपे, संघणक परिचालक सागरजी काकडे, ग्रा.पं. कर्मचारी शंकरराव भोयर, ग्रा.पं. कर्मचारी प्रकाशजी मेश्राम आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
