
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225).
शेतकऱ्यांची प्रतिक्रीया, महाराष्ट्र शासनाच्या म हा B,t, Portal या योजनेची कुठली ही माहिती आज पर्यंत धानोरा गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागा कडून देण्यात आलेली नाही,कृषी सहाय्यक तर 1 वर्षा पासून गावात फिरकले सुद्धा नाहीं, या गावातील शेतकरी , जितेंद्र कहूरके यांनी तालुका कृषी अधिकारी यांना फोन करून विचारले असताना च तालुका अधिकारी याचा कडून विचारणार आले की तुमचा गावात कोण कृषी सहाय्यक आहे, तालुका कृषी अधिकारानाच जर कोणता गावात कोणते कृषी सहायक आहे हे माहीत नसेल तर शासनाचा योजना ची माहिती शेतक-यापर्यंत कशी पोचणार, 2 दिवसात शासनाचा योजना ची माहिती स्वतः तालुका कृषी अधिकारी पाटील मॅडम यांनी गावात येऊन दिली तर टिक नाही तर लॉकडाऊन चे नियम तोडून तालुका कृषी अधिकारी ऑफिस मध्ये शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा,
शेतकरी, जितेंद्र गोपाल बाबू कहूरके, यांनी दिला आहे.
