युवा नेतृत्व वकील सुरज महातळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश…

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वणीतील प्रसिद्ध युवकांच्या मनात अधिराज्य गाजविलेले वणीतील वकील सुरज महारतळे यांनी आज दिनांक 09 ला चंद्रपूर येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात युवकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

वणीतील प्रसिद्ध युवा नेतृत्व असलेले व एकेकाळी युवा विराट मोर्चाचे नेतृत्व केलेले प्रखर व्यक्तिमत्त्व ऍड. सूरज महारतळे, गिरीश कुबडे, ऍड. शुभम महारतळे, सौरभ देरकर, आकाश बोबडे यांच्यासह युवकांचा आज वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत मोठ्या प्रमाणात युवकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वणी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर यांची उपस्थिती होती.