
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव नगरपंचायत चे वार्ड क्रमांक 5 चे उमेदवार नंदकुमार गांधी यांच्या कल घेतला असता नंदू शेठ चा पंजा च निवडून येणार असे वार्ड क्रमांक 5 चे मतदार बोलल्या जात आहे. त्यांच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये संपूर्ण धुरंधर त्यांची टीम अग्रेसर रित्या काम करत आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे इतरही 14 वार्डात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत आहे प्रचारात व मुख्य प्रचारात लोकांच्या तोंडातून पंजा च निघत आहे. भाऊ आणि सरांनी विशेषता प्रत्येक वार्डात लक्ष दिल्याने काँग्रेसची बाजू जास्त प्रमाणात दिसत आहे. आजचा तर कल असा दिसतात की 14 वार्डातील 14 ही जागा काँग्रेसच्या निघण्याचे चिन्हे दिसत आहेत. भाऊ आणि सर चे सर्व कार्यकर्ते जोमाने काँग्रेसच काम करीत आहे हे विशेष.
