धनगर अधिकारी कर्मचारी सन्घटनेची राळेगाव येथे सभा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)

धनगर अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा यवतमाळ ची सभा दि.23.01.2022 रविवार रोजी राळेगाव येथे श्री.योगेशभाऊ गलाट यांचे निवासस्थानी संपन्न झाली यावेळेस धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे यवतमाळ जिल्हा मार्गदर्शक समाजाचे नेते वसंतराव ढोके, पवन थोटे, यवतमाळ येथून उपस्थित झाले होते,यावेळेस वसंतराव ढोके,पवन थोटे,यांनी सभेला मार्गदर्शन करून सन्घटनेची ध्येय धोरणे समजावून सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री.योगेश गलाट यांनी केले तर यावेळेस श्री.भिमराव कोकरे,श्री.महेशराव चिव्हाणे,श्री.विजयराव धानोरकर, श्री.किशोर ढवळे,श्री.योगेश गलाट,श्री.नितीन कोरडे,ऑड चेतन गलाट,श्री.दिलीप चामाटे, सौं.तेजस्विनी गलाट,कू.ओमेश्री गलाट आदी समाज कर्मचारी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,यावेळेस जिल्हा कार्यकारिणी साठी राळेगाव येथून नाव निश्चित करून जिल्हा कार्यकारिणीला लवकरच कळविण्यात येईल असे ठरले तर,राळेगाव तालुका संयोजक पदी सर्वानुमते श्री.योगेशभाऊ गलाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली,तसेच लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात येईल व सर्वानी सन्घटना मजबूत करून तालुक्यातील धनगर समाजातील राळेगाव तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नोंदणी करण्यात येईल असे संगितले,यावेळेस श्री.वसंतराव ढोके,पवन थोटे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले तसेंच यावेळेस धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा यवतमाळ तर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले व सर्व कर्मचारी समाज बांधवाना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले