लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

पुसद शहर पोलीस स्टेशन मधील डिबी पथकातील पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती असून या संदर्भात वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कारवाई करीत होते.

पुसद शहर पोलीस स्टेशन मधील डिबी पथकातील एक पोलीस अंमलदार दारूच्या केसमध्ये सोडून देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार दिली होती. त्यावरून आज वाशिम पथकाने डिबी पथकाच्या अंमलदारावर पाळत ठेवून त्याच्यावर कारवाई केल्याचे समजते. याबाबत कारवाई अधिकाऱ्यास विचारणा केली असता संबंधित अंमलदारावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली, मात्र पोलीस अंमलदारावर झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने पोलीस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. वृत्त लिहिस्तोर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.