राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक सभा संपन्न ( तालुक्यातील अनेक पत्रकारांचा संघटनेत समावेश, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाशी संलग्न )

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)


येथील शासकीय विश्रामगृहात आज दिं २२ जून २०२१ रोज मंगळवार ला राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सभेचे अध्यक्ष म्हणून राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ के एस वर्मा तर सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके सचिन चौधरी पवन धोत्रे उपस्थित होते या वार्षिक सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यामध्ये संघटनेत शहरी व ग्रामीण पत्रकारांना सदस्यत्व बहाल करने, वर्षभरातील विविध सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करणे यासह अनेक विषयावर चर्चा होऊन आपण जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या संघटनेशी संलग्न व्हावे या विषयावर सर्वानुमते एकमत झाले या अनुषंगाने स्वर्गीय पी एल शिरसाट प्रणित जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांच्या नेतृत्वात ३० पत्रकारांसह राळेगाव तालुका पत्रकार संघटना संलग्नित करण्यात आली आहे यावेळी राळेगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना राळेगाव तालुका पत्रकार संघटनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे यावेळी जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी नव्याने जिल्हा ग्रामीण पत्रकार संघा मध्ये संलग्न झाले आहे अशा पत्रकार बांधवांच्या व राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील असे वक्तव्य जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केले यावेळी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकार दीपक पवार, शंकर जोगी, अजिज नबी शेख, श्रीकांत कवाडे, मंगेश चवरडोल, दिनेश सराटे, रितेश भोंगाडे, शालिक पाल, सचिन राडे, जावेद पठाण, यांचा समावेश या वेळी करण्यात आला असून अनेक पत्रकार बांधव संघटनेत समाविष्ट होण्याकरिता इच्छुक आहेत यावेळी उपस्थित जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके वनीकरण विभागाचे संजय केराम संकल्प व्यसनमुक्ती केंद्र यवतमाळ चे प्रवीण टिप्रमवार व नव्याने पत्रकार संघटनेत आलेल्या पत्रकार बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला असून सामाजिक बांधिलकी जोपासत राळेगांव तालुका पत्रकार संघटना व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले असून कार्यक्रमाला तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक पिंपरे , सचिव मंगेश राऊत, उपाध्यक्ष राष्ट्रपाल भोंगाडे , महेश भोयर,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश मेहता, डॉ के एस वर्मा,महेश शेंडे, प्रा.मोहन देशमुख, राजेश काळे,फिरोज लाखांनी, प्रमोद गवारकर, विनोद चिरडे, राजू काळे,दीपक पवार, सचिन राडे, मंगेश चवर’डोल, शंकर जोगी, संजय दुरबुडे, अजिज नबी शेख, शालिक पाल, श्रीकांत कवाडे, रंजीत परचाके, जावेद पठाण, रितेश भोंगाडे, आदी उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन फिरोज लाखांनी तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष पिंपरे सर तसेच आभार प्रदर्शन मोहन देशमुख यांनी केले आहे.