प्रियसीचा मृतदेह स्मशानभूमीत सोडून प्रियकर पसार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

रात्री अज्ञात इसमाने तीस वर्षीय महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आणून ठेवल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

राळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महिला ही भारी तळेगाव जिल्हा यवतमाळ येथील असून तिचे नाव शिल्पा पंजाब वाटोळे वय तीस वर्ष असे आहे आठ वर्षापूर्वी तिचा विवाह झाला असून तिला दोन राधा वंशिका अशा दोन मुली आहेत दरम्यान ती गेल्या दोन वर्षापासून आपल्या प्रियकर राजू सोयाम यावली कारेगाव तालुका घाटंजी याचा सोबत राहत होती दरम्यान मृतक महिलेची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला उपचाराकरिता वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भरती केले होते उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला अशातच ही माझी पत्नी आहे अशी बतावणी करून राजू स्वयम् या प्रकारांनी तिचा मृतदेह गाडीने राळेगाव स्मशानभूमीत आणला येथे तिचे नातेवाईक अंत्यसंस्कार करता येणार आहे अशी गाडी चालकाला सांगून गाडी चालकाला रवाना केले मात्र प्रियकर राजू सोयाम यांनी आपल्या प्रियासिचा मृतदेह राळेगाव स्मशानभूमीत ठेवून पसार झाला. सकाळी घटना लक्षात येतात राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली राळेगाव पोलिसांनी तरुणीची आई सुरेखा महादेव मेश्राम राहणार भारी तळेगाव यांच्या तक्रारीवरून 147 मग दाखल केले आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.