आदिवासी सेवक श्री किरणभाऊ कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य तथा आदिवासी सेवक श्री किरणभाऊ कुमरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते किरणभाऊ कुमरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी कांग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद इंगोले, वसंत जिनिंग राळेगावचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपकराव देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्रभाऊ तेलंगे, राजेंद्र ओंकार, अंकित कटारिया,राहूल होले, अंकुश मुनेश्वर,अफसर अली, अशोक काचोळे,श्रावनसिंग वडते,रामभाऊ भोयर पाटील, मंगेश राऊत, विनोद जयपूरकर, गजानन पाल, गोवर्धन वाघमारे, सतिश डाखोरे सह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी सर्व मान्यवरांनी किरणभाऊना शुभेच्छा दिल्या.