
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी वाढोना गटाच्या जी,प सदश्या सौ प्रीतीताई संजयभाऊ काकडे या यशदा च्या मार्गदर्शक बनल्या जीप सर्कल करिता ही अभिमानाची बाब आहे विशेषतः किन्ही जवादे गावातून जि प सदस्या म्हणून निवडून येऊन ते संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती सिनेट मेंबर असून व आता यशदा च्या मार्गदर्शक म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंचांना वर्धा येथे मार्गदर्शन केले.
जी प वडकी सर्कलसाठी कामाचा पाठपुरावा लावून धरून त्यांनी बरेचसे कामे सर्कलमध्ये ओढून आणले.वडकी वाढोना गटात अनेक कामाचे भूमिपूजन करून ती कामे मार्गी लावली,जनतेची कोणतेही अडलेली कामे असो त्या कामांना ते मार्गी लावतात त्यामुळे तालुक्यात त्या लोकप्रिय व अभ्यासू जि प सदस्या म्हणून जनतेत ओळखल्या जात आहे.
