यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त मतांची आघाडी घेऊन काँग्रेस पक्षाच्या सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत विजयी..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नुकत्याच पार पडलेल्या राळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 मध्ये राळेगाव शहरातील एकूण 17 प्रभागातील निवडणुक प्रक्रिया पार पडली निवडणुकी मध्ये सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचा सहभाग होता. सर्वसाधारण साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा, व चार अपक्ष अशा एकूण आठ उमेदवारांनी निवडणूक लढविली दि १९-१-२२ रोजी जाहीर झालेल्या निकाला मध्ये प्रभाग क्र. 11 मधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत यांना एकूण 465 मते मिळाली, 301 मतांची आघाडी घेत सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांची आघाडी घेणाऱ्या उमेदवार ठरल्या.
त्यांनी प्रभाग क्र. 11 मधील समस्त मतदारांचे आभार मानून प्रभागातील स्थानिक सोयी-सुविधा, विकास कामे करू असा शब्द दिला. व सो.ज्योत्स्नाताई भानुदास राऊत नी सांगितले की हा विजय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे झाला.