
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जी.ओ.च्या बोगस नेटवर्किंग मुळे राळेगांव शहरातील व तालुक्यातील ग्राहक संतप्त हो आहे.
फक्त मुख्य रस्त्यावर च नेट कामं करतेय,शहरातील आतील प्रभागात नेटवर्क चं मिळत नाही.कधी कधी तर दोन दोन तास नेटवर्क नसतं. मोबाईल बँकिंग साठी खुप त्रास होतो. जसे बाहेर नेटवर्क असतं तसंच नेटवर्किंग सर्व ठीकाणी मिळायला हवं…
सुरुवातीला सर्वात चांगले नेटवर्किंग देणारं म्हणून अनेक ग्राहकांनी इतर कंपनी च्या भ्रमणध्वनी क्रमांक जी.ओ.मध्ये “कन्व्हर्ट”केलंय. पण जसजशी ग्राहकांची संख्या वाढली तसतसे नेटवर्कमध्ये समस्या वाढू लागली आहे. शहरात व तालुक्यात यांचे कोणी वाली नाही का?
असा संतप्त सवाल आता ग्राहकांचा असून,जिल्हा स्थानी असणाऱ्या जी.ओ.कंपनी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ही ग्राहकांची समस्या सोडवावी एवढिच अपेक्षा या नामवंत जी.ओ.कंपनी कडून आहे.
