आज छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरचे आयोजन

आज छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वरध येथील स्वर्गीय श्रीमती शांताबाई चंपतराव बातुलवार व स्वर्गीय रामचंद्रजी रागेनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरध येते छावा प्रतिष्ठान वरध यांच्या वतीने निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन केलेले आहे, दिनांक 12/05/2022 ला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन केले आहे, तरी तालुक्यातील समस्त जनतेने या शिबीराचा लाभ घ्यावा असे छावा प्रतिष्ठान वरध तर्फे सांगण्यात येत आहे या कार्यक्रमाला उद्घाटक माननीय श्री वसंतरावजी पुरके माजी शिक्षण मंत्री ,कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रफुल भाऊ मानकर कृ. ऊ.बा.स.राळेगाव, माननीय श्री अरविंद भाऊ वाढोनकर विदर्भ फेडरेशन संचालक,अरविंद भाऊ फुटाणे, प्रवीण भाऊ कोकाटे, मिलिंद भाऊ इंगोले,नंदू भाऊ गांधी, राजूभाऊ तेलंगे, अंकुश भाऊ मुनेश्वर, निलेश भाऊ रोठे हे हजर राहणार आहे, तरी तालुक्यातील सर्व जनतेने या शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक श्री संजयभाऊ चंपतराव बातूल वार संचालक खरेदी विक्री संघ राळेगाव तर्फे करण्यात येत आहे.