संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती राळेगाव मध्ये उत्साहात साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती राळेगाव मध्ये भव्य मिरवणूक,दिंडी आणि समाज प्रबोधन असे कार्यक्रम करून साजरी करण्यात येते.परंतु गेल्या 2 वर्षांपासून कोरोना जागतिक महामारी मुळे शासनाने दिलेले निर्बंध पाळून या वर्षीच्या जयंती ही अत्यंत साधेपणाने प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील जेष्ठ मार्गदर्शक ताटेश्वर पिसे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक काचोळे, तालुका अध्यक्ष संदिप राडे,तालुका सचिव संदिप क्षीरसागर ,बाळू धुमाळ,निलय घिनमीने,घनश्याम फटींग,गोपाल भटकर,मारोतीराव बेलखेडे,रामू उरकुडकर, सुनील सावरकर,सुरज गुजरकर,संदिप टुले, रुपेश लाकडे,मधुकर राजूरकर, विनोद क्षिरसागर, भलमे, आदी समाज बांधव उपस्थित होते.