श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक १५/२/२०२२ रोजी बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर सर यांनी प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात केली.त्यानंतर सर्व उपस्थित शिक्षकानी प्रतिमेचे पुजन केले त्यावेळी विद्यालयाचे शिक्षक सर्वस्वी दिगांबर बातुलवार सर,राजेश भोयर सर,रंजय चौधरी सर,मोहन आत्राम सर विशाल मस्के सर,सौ कु कुंदा काळे मँडम,सौ वंदना वाढोनकर मँडम,स्वाती नैताम मँडम,वैशाली सातारकर मँडम,कोल्हे मँडम, अमित बातुलवार तथा शिक्षकेत्तर कर्मचारी,पवन गिरी,शुभम मेश्राम, बाबूलाल येसंबरे,विनोद शेलवटे उपस्थित होते.