
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भाऊ भोयर 9529256225
शासनाने घरकुल ची प्रपत्र ड यादी तयार करण्यात चे काम सुरु केले आहे. यात जीओ मँपींग साठी बरेच दिवस घोळ घातला, तो अद्यापही संपला नाही.2011चे सर्वेक्षणानुसार यादी आहे. मागील १० वर्षात त्या यादीतील जे मयत आहे,त्यांचे वारसांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकुल मिळण्यासाठी शासनाने अनेक जाचक अटी ठेवल्या आहेत.फ्रीज, मोटरसायकल, शेती,उत्पन्न, नौकरी,अशा अनेक अटी ठेवल्या.यादीला चाळणी लावण्याचे कठीण आणि वादग्रस्त काम ग्रामपंचायत ,ग्रामसभेस दिले आहे.शासनाच्या विविध विभागाकडे असलेली माहिती ऐकत्र करून शासकीय कर्मचार्यांकडून यादी तयार करून ती ग्रामसभेत ठेवण्यात यावी.जेणेकरुन गावात घरकुल साठी वाद होणार नाही.
