पिपळापूर येथे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

      

आदिवासींचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती पिपळापूर येते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. ह्यावेळी सहभोजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गावातील विविध समाजातील लोकांनी एकजूट होऊन अभिवादन केले.
ह्या प्रसंगी पुंडलिक कुळसंगे, प्रविण कुळसंगे ( शाखा अध्यक्ष – ट्रायबल फोरम, पिपळापूर),विकास कोडपे, राहुल येडमे,सुहास कोवे, सुमित कुळसंगे, चिंदु चांदेकर, विशाल कुळसंगे, बंडू चांदेकर, प्रशांत कुळसंगे, राहुल कोडापे, नवनीत कुळसंगे, रुपेश कुळसंगे, शांताराम मेश्राम, संजय कोडापे, हनुमान गेडाम, शंकर कुळसंगे, सोपान चांदेकर, प्रमोद येडमे, दुर्गाबाई चांदेकर, माया कुळसंगे, माधुरी कुळसंगे, विधा कोडापे, सुनिता चांदेकर, सुनंदा मेश्राम, सुहानी कुळसंगे, अरुणा कुळसंगे, यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.