
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने राळेगाव तालुक्यात भाजपा कार्यालय येथे नोटीस जाळुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात पोलीस बदल्यांचा घोटाळा उघड करणारे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी चौकशी साठी नोटीस दिली. या प्रकारा नंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यभरात आक्रमक झाली. राळेगाव भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोटीसीच्या प्रती जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
