वरोरा येथील तहसीलदारावर प्रशासकीय कारवाई करा: राळेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वरोरा येथील दैनिक नवजीवन प्रतिनिधींच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा असंविधानिक पध्दतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीस लावला होता.या घटनेचा आज राळेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी येथील तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्या मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन वरोरा येथील तहसीलदारांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या तहसीलदार रोशन मकवणे यांनी दबावतंत्राचा वापर करून पत्रकारांना धमकविल्याची घटना वरोऱ्यात घडली.दै. नवजीवन वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओम चावरे यांना तुम्ही माफी मागा अन्यथा तुमच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीसच त्यांच्या घरावर लावण्याचा प्रकार तहसीलदार रोशन मकवाणे यांनी केला. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवून आज राळेगाव तालुक्यातील स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव च्या वतीने राळेगाव चे तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्या मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून तहसीलदार रोशन मकवाणे यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देते वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पिंपरे, मंगेश राऊत, महेश शेंडे, फिरोज लाखानी, प्रकाश मेहता,शंकर वरघट, विशाल मासुरकर, मंगेश चवरडोल, प्रमोद गवारकर, विलास साखरकर, गुड्डू मेहता,रंजित परचाके,रामु भोयर,संजय कारवटकर,आशिष मडकाम,मनोहर बोभाटे, गजेंद्र कुमार ठुणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.