
1
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यातील खैरी, पिंपरी, झाडगावसह आष्टोना या ठिकाणी डेंग्यू आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील खैरी व दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील पिंपरी तसेच आष्टोना या गावात काही प्रमाणात संशयित रुग्ण आढळले असून आजही या गावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याला तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाळ पाटील यांनी दुजोरा दिला आहे.झाडगाव येथे संशयित रुग्ण अधिक असल्याचे नागरिकांचे मत आहे झाडगाव येथील आरोग्य केंद्राचे डॉ सुरज मोरे यांनी सांगितले की येथे एक २२ वर्षीय युवकाला डेंग्यूची लागण झाली असून तो उपचार घेत आहे आणि तीन संशयित रुग्ण यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे झाडगाव गावात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले असून एक दिवस कोरडा दिवस पाळावा फोग मशीनची फवारणी इत्यादी उपाय योजना व नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे.नुकत्याच कोरोना आजाराच्या भितीत जनता असताना डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आरोग्य विभाग याकडे लक्ष घालत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाळ पाटील यांनी लोकहीत महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.
