
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ, अर्जुना, मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थि सौरभ वाळके, सुरज गोल्हर ,भिषेक जोगे ,महेश भोयर ,गोपाल वाशिमकर यांनी ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत अर्जुना येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवत मार्गदर्शन केले.
शेती उत्पादन वाढविण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असून त्यातुन जमिनीला पोषक तत्वे अर्थात सुक्ष्म अन्नद्रव्याचा वेध घेत खत दिल्यास शेतकऱ्यांना पैशाची सुध्दा बचत होवुन उत्पादनात भर पडेल, अशी मौलीक माहीती देवुन अर्जुना येथील शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडु, कार्यक्रम अधिकारी एस.व्ही.महानुर, विषयतज्ञ आर. नागमोटे यांच्या मार्गदर्शनात माती परीक्षण उपक्रम राबविण्यात आला.
