
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ता. (१७): आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी हिंदू हृदय tvसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने वडकी हायवेवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालील बाळसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर श्रीकांत ज्ञानेश्वर राऊत उपसरपंच ग्रामपंचायत खैरी व श्री सुरेश भाऊ मेश्राम माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव यांनी केले.तद्नंतर बाळसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार श्री मनोज भोयर उपतालुकाप्रमुख राळेगाव यांनी अर्पण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला सुरेश भाऊ मेश्राम माजी उपसभापती राळेगाव, मनोज भोयर शिवसेना उपतालुका प्रमुख राळेगाव, डॉक्टर श्रीकांत राऊत उपसरपंच ग्रामपंचायत खैरी, खुशाल वानखेडे शिवसेना तालुका संघटक, सौ पार्वताबाई मुखरे महिला शहर प्रमुख राळेगाव, सौ प्रीती भगत, सौ शालू तुमराम, दिवाकर जवादे, किशोर वाघ हेमंत वाभिट कर, शरद सराटे, समीर भेदुरकर, महादेव मुखरे, सुनील सावरकर, विनोद मोरे, किशोर कोकाटे उपसरपंच झुलर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
