
.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यामध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे आज दि 22 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता त्यांना असाच एक फोन वडकी येथील वैभव इंगोले,सोमेशवर पिपराडे,चेतन पिपराडे,सागर पिपराडे, अक्षय बोरपे , यांचा वार्डमध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती सर्पमित्र शुभम जोगे यांना दिली.क्षणाचाही विलंब न करता वडकी येथील T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव. मधील सदस्य शुभम जोगे सागर सलाम,आकाश आत्राम यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता. तिथे त्यांना अजगर या जातीचा साप वार्ड मध्ये असलेल्या गोठ्यात दिसून आला. सापाची लांबी अंदाजे 10 फूट असून 10 ते 15 किलो त्याचे वजन आहे त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली. व वनअधिकाऱ्याचा समक्ष त्या अजगराला सोडण्यात आले.ह्यावेळी सापाला बघण्याकरिता असंख्य नागरिकांची गर्दी जमली होती.
