छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम जि. प. उच्च प्राथमिक शाळा येरला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

आज दिनांक 19 फेबुवारी ला जि.प. उच्च प्राथमिक शाळा येरला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन श्री . जयंतराव भै. कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व सदस्य याच्या हस्ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कार्यकमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री . अनिलराव खंडाळकर सदस्य श्री. अमोलराव तेलंगे, श्री. शंकरराव भोकरे . श्री विजयराव नांदेकर. श्री प्रमोदराव झिले. श्रीमती शुभांगीताई नगराळे ,सौ. सिमाताई टापरे.सौ. सुनिताताई उमाटे. सौ . मंगलाताई जोगी व काही पालकवर्ग व तरुण वर्ग उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याधापक श्री. कुंभारे सर यांनी केले.त्यांनी शिवजयंतीनिमित्य मुलांना माहिती सांगीतली. तर शाळेचे शिक्षक श्री पेंदोर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहीती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री बारापात्रे सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री. जयंतराव भै. कातरकर यानी छञपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहीती सांगितली. कार्यक्रमा मध्ये विद्यार्थीनी कु. मनकर्णिका कातरकर. कु सायली खंडाळकर. कु भावना उमाटे यांनी भाषणे दिली. कार्यक्रमाचे शेवटी आभार कु. पाल मॅडम यांनी मानले.