वडकी येथे कोकाटे सभागृहात भरारी महिला प्रभात संघाची वार्षिक सभा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे कोकाटे सभागृहात दि. ९ एप्रिल रोजी भरारी महिला प्रभात संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा सपंन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक ऊईके तर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य चिंतरंजनदादा कोल्हे, माजी जि.प.सदस्या प्रिती संजय काकडे, राजेद्र डांगे उपस्थित होते.

महिला सर्वसाधारण सभेला संबोधित करताना आमदार ऊईके यांनी ‘ऊमेद व महिलांनी सुरु केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या व व्यावसायिक चालना मिळाली व महिलांनी अनेक कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होण्याकरिता व आर्थिक बचत पण करता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना व मजुरांना पण कमी टक्के व्याजाने पैसे मिळत असल्यामुळे महिलांच्या परिवारांचा आर्थिक व व्यावसायिक विकास झाला आहे व यापुढेही महिलांनी असेच गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व व्यावसायिक विकास करावा,’ असे मार्गदर्शन केले.

या सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे, जिल्हा परिषद सदस्य चित्तरांजन कोल्हे यांनी सुद्धा सभेला उपस्थित असलेल्या महिलांना उत्तम असे मार्गदर्शन केले. या सभेमध्ये भरारी महिला संघातर्फे उत्कृष्ट असे बचत गटावर कला नाट्य, नृत्य महिलांनी करून दाखविले. चिमुकल्या मुलींनी नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. काहींनी गोंडी नृत्य, नाटक, कला यात सहभाग नोंदविला. या प्रसंगी क्षमता बांधनी तालुका व्यवस्थापक राजेद्र खुरपडे, धनवंत शेंन्डे, तालुका व्यवस्थापक बी.एम एफ.आय,.अविनाश तराडे, प्रभात समन्ययक वडकी, दिनेश कोवे (प्रभात समन्ययक वरध), श्रृतीका गवाददिपे (प्रभात समन्वयक), विद्या लाड (प्रभात अध्यक्ष), विजेता भंडारी (प्रभात कोक्षाध्यक्ष), मनिषा यादे (प्रभात व्यवस्थापक), कोकिळा कवाडे, नीलिमा धोटे, अश्विनी चौधरी, सुभाष वाटगुळे, मंगेश पुडके तसेच उपस्थित सर्व प्रभागातील कॅडर एफ एल सि आर पी, सि.टी.सी ,कृषिसखी, पशुसखी वार्षिक आढावा सभा २७ ग्राम संघ प्रतिनिधी ४३० समूहाच्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी सण २०२० ते २०२१ चे ऑडिट वाचन करण्यात आले. या सभेला प्रभाग संघ पदाधिकारी ग्रामसंघ पदाधिकारी व हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भरारी महिला संघाच्या अध्यक्ष विद्या मोहन लाड यांनी अथक परिश्रम घेतले.