झाडगावात डेंग्युचा हाहाकार लहान मुले तापाने आजारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथे डेंग्यू तापाचे लक्षणे आढळून आले असुन अनेक लहान मुले आजारी पडले आहे त्यामुळे गावात तापाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दिसून येत आहे डेंग्यूचा आजार पसरला असल्याने गावात इलाज होत नाही त्यामुळे राळेगाव तालुक्याच्या ठिकाणी जाऊन उपचार करावे लागत आहे पहिलेच कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असल्याने त्यात आता डेंग्यू हा नवीन आजार आला त्यामुळे सामान्य नागरिकांना डेंग्यू वर इलाज करने महागात पडत आहे पैशाची चनचन भासत आहे आज राळेगाव येथे जाऊन उपचार करावे लागत आहे त्यामुळे गरीब व गरजु रुग्णाला परवडणारे नाही त्यामुळे तर गावात आरोग्य कँप लावुन रुग्णावर उपचार करावा अशी मागणी होतांना दिसून येते गावात आयुर्वेदिक दवाखाना असुन काही फायदा होत नाही या दवाखान्यात कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही औषधी नाही मग इलाज कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे आज गावात आयुर्वेदिक दवाखाना असून रुग्णांना बाहेर ठिकाणी इलाज करावा लागत आहे त्यामुळे आरोग्य विभागा विषयी रोष व्यक्त होतानां दिसून येते तीन चार हजार लोकसंख्येचे गाव असुन मात्र या गावात डॉक्टर राहत नाही आरोग्य सेविका आशा सेविका यांची कोणतीही मदत रुग्णानां होत नाही घरोघरी भेट दिल्या जात नाही गावात मोठ्या प्रमाणावर तापाचे रुग्ण असतांना आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारची मद्दत अध्यापही केली नाही गावात डेंग्यू सारख्या आजाराने डोकेवर काढले असतांना आरोग्य विभागाने गावात आरोग्य कँप लाऊन तपासणी करावी अशीमागणी होतानां दिसुन येते.