
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील परसोडा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दिनांक १९.०५.२०२२ ला झाली असता. यावेळी अध्यक्ष म्हणुन श्री. किशोर प्रभाकराव कांडुरवार रा. करजी (सो) यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्री गुलाब हुसनाजी मेढे रा. परसोडा यांची अविरोध निवड करण्यात आली.
यांवेळी संस्थेचे निवडणुक निर्णय सौ. एस. आर. भोयर नवनिर्वाचित संचालक श्री. अतुल रामदासजी जवादे, श्री. महादेव वैशाख तुणकर श्री. शरद शामराव वैद्य श्री. मारोती अजाबराव ठाकरे श्री. प्रमोद नारायण देठे श्री. बाला जनार्धन देठे सौ. लताबाई नंदकिशोर देऊळकर सौ. बेबीताई रमेश तुरणकर सौ. शालु सुरेश देऊळकर श्री. सुधिर हिरालाल घुगरे श्री हनुमान महादेव सातघरे व सचिव श्री. एम. बि. कारमोरे यांच्या उपस्थित अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे आभार मानले. अध्यक्ष श्री. किशोर कांडुरवार तर उपाध्यक्ष श्री. गुलाब मेंढे यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
