स्वखर्चाने ,स्वतः च्या जमीनीवर लोकांसाठी रस्ता बांधुन दिला, आदित्य सुधीरभाऊ जवादे यांचे प्रशंसनीय कार्य.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राष्ट्रीय महामार्ग नजीकच्या कीन्ही जवादे ते गाडेघाट,बोरी ईचोड हा पुर्वीचा पांधन रस्ता काही शेतकऱ्यांनी वहीतीत घेतला होता त्यामुळे रस्ता बंद झाला होता.अशावेळी बेंबळा प्रकल्पाचे कालव्याचे रस्त्याचा वापर शेतकरी व इतर नागरिकांना करावा लागत होता.कालव्याचा रस्ता अतिशय नागमोडी वळणे घेऊन,फेरा घेतलेला होता.त्यावर अपघात होत होते,ही बाब लक्षात घेऊन आदित्य सुधीरभाऊ जवादे यांनी आपल्या जमिनीतील जागा रस्त्याकरीता दिली, एवढेच नव्हे तर स्वखर्चाने लोकांकरिता रस्ता बांधुन दिला.या रस्त्यामुळे बोरी ईचोड,गाडेघाट,व कीन्ही या तीन गावांतील शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे.आदित्य सुधीरभाऊ जवादे यांनी लोकांसाठी स्वखर्चाने रस्ता बांधण्याच्या कामाचे परिसरात कौतुक होत असुन शेतकरयांना समाधान आहे.जवादे परिवाराचे लोकसेवेचे व्रत पिढ्यानपिढ्या सुरूच राहील अशी ग्वाही इंजिनिअर आदित्य सुधीरभाऊ जवादे यांनी दिली.