रिधोरा ग्रामपंचायतला महा आवास अभियान पुरस्कार प्राप्त,सरपंच, सचिव यांच्या पुढाकाराने २०२१ते २२ चा महा आवास अभियान पुरस्कार प्राप्त

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायतला पुरस्कार प्राप्त सविस्तर वृत्त असे २०२१ ते २२ या वर्षा साठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २० ते २२ घरकुल रिधोरा गावांसाठी मंजूर झाले होते . सदर सरपंच उमेश गौऊळकार , सचिव वीना राऊत यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहित केले होते सदर सरपंच, सचिव यांनी सांगितले प्रमाने संपूर्ण लाभार्थ्यांनी आप आपली घरे बांधून पुर्ण केली असल्या कारणाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने १५ आगस्ट रोजी राळेगाव येथे गटविकास अधिकारी केशव पवार व सहाय्यक गटविकास अधिकारी पदमाकर मडावी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती राळेगाव महा आवास अभियान पुरस्कार २०२१-२२ तालुकास्तरीय क्लस्टर प्रथम पुरस्कार वरील अधिकारी यांच्या हस्ते रिधोरा ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गौऊळकार व सचिव वीना राऊत यांना देण्यात आला.