राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी रब्बी उन्हाळी ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली पिकं हे चांगले आले असून पिकाला मिळत असलेला भाव व मजुरांची टंचाई यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीस आलेला आहेllll एकेकाळी राळेगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतल्या जात होते शेतकऱ्याकडे असणाऱ्या सालगड्याला त्याकाळी ज्वारी दिल्या जात होते तसेच घरी असलेल्या गाय बैल म्हैस आधी जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारीचा कडबा उपयोगात येत असल्याने मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड शहरासह तालुक्यात केले जात होते अलीकडच्या काळात ज्वारी ही तालुक्यातून हद्दपार झाली होती पण यावर्षी मात्र शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड केली आहे यावर्षी कापसाचा हंगाम लवकर संपल्याने तसेच चाऱ्याची कमतरता असल्याने यावर्षी शहरासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी उन्हाळी ज्वारीकडे वळला आहेत ज्वारीला अवकाळी पावसाचा तसेच गारपिटीचा फटका काही भागात कमी प्रमाणात बसल्याने ज्वारीचे पीक सुद्धा चांगले आले आहेत काही शेतकऱ्यांची ज्वारी ही काढणे सुरू आहेत तर काही शेतकऱ्यांची ज्वारी ही काढण्यात आलेले आहेत ज्वारी काढण्यासाठी मात्र शेतकऱ्याला मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहेत सध्या उन्हाचा पारा हा 40° चा वरती आहे त्यामुळे मजूर ज्वारी चे काढणे करण्यासाठी तयार नाहीत जे मजूर तयार आहेत ते अव्वाच्या सव्वा भाव सांगतात नाईलाजाने शेतकऱ्याला जास्तीचे पैसे देऊन ज्वारी काढावे लागत आहे कारण ज्वारी जर काढली नाही तर त्याचे दाणे खाली पडून त्या मातीमोल होतात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले गेल्याने ज्वारीचे उत्पादन तालुक्यात बऱ्यापैकी झाले पण ज्वारीला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने येथे सुद्धा शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागत आहेत 2000/ 2200 च्या दरम्यान ज्वारीची विक्री ही केल्या जात आहे जे हमीभावाच्या कमी आहेत शासनाने हमीभावाचे खरेदी केंद्र उघडले नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्याला बाहेर ग्राहकांना थेट किंवा व्यापाऱ्याला ज्वारी विकावी लागत आहेत शासकीय खरेदी केंद्र नसल्याने या गोष्टीचा फायदा व्यापारी घेतात व मलाला कमी भाव देतात मोठ्या उमेदीने यावर्षी शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून ज्वारीचे पीक घेतले काही भागाचा अपवाद वगळता ज्वारीचे पीक चांगले आले सुद्धा पण ज्वारी पिकाला होत असलेला खर्च व मिळणारा भाव यात खूप तफावत असल्याने तसेच शासकीय खरेदी केंद्र ज्वारी या पिकासाठी उपलब्ध नसल्याने पुढच्या वर्षी ज्वारीचे पीक घ्यायचे का नाही याचा विचार नक्कीच शेतकरी करतील यात शंका नाही.