
प्रतिनीधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
महागांव :: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून संबंधित कुटुंबाला चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेती उपलब्ध करून दिली जाते सरकारी जमीन उपलब्ध नसेल, तर खासगी जमीन विकत घेऊन ती संबंधित लाभार्थ्यांना दिली जाते. सध्यस्थितीत नीधी अभावी ही योजनाच थांबलेली असून ती प्रशासकीय स्तरावर प्रभावीपणे राबवावी अश्या आशयाचे निवेदन सौ संध्या संदेश रणवीर यांनी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र यांना तहसीलदार महागांवमार्फत देवून निवेदनातून मागणी केली आहे.
या योजनेअंतर्गत जमीन वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. या समितीत समाजकल्याण संचालक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भूमी अभिलेख अधिकारी, सहनिबंधक, नोंदणी शुल्क व मूल्यांकन सहाय्यक संचालक इत्यादी सदस्य असतात. या योजनेंतर्गत गावाच्या परिसरात असलेल्या उपलब्ध नवीन परिसरात राहणारे भूमिहीन शेतमजूर यांच्या नावाने चिठ्या टाकून संबंधित समिती लाभार्थ्यांची निवड केली जाते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची डाॅ हर्षदिप कांबळे हे जिल्हाधीकारी असतांना या योजनेला प्रभावीपणे यवतमाळ जिल्ह्यात राबवण्यात आले होते मात्र मागील काही वर्षात अनुसूचित जाती व नवबैाद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतकऱ्यांना या योजने पासुन निधी अभावी वंचीत राहावे लागत आहे त्यावेळी लाभार्थ्यांना कसायला जमीन मिळाल्याने आता ते जमीन मालक झाले आहे. या जमिनीमुळे त्यांना उत्पादनाचे साधन मिळाले आहे. व जिवनमान उंचावले आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली असून जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. प्रारंभी कोरडवाहू व ओलीताच्या जमिनीकरिता सरसकट एकरी तीन लाख रुपये मिळत होते. आता नवीन आदेशानुसार कोरडवाहूकरिता ५ लाख रुपये तर ओलीताच्या जमिनीकरिता ८ लाख रुपये अनुदान मिळते या योजनेची अंमलबजावणी करीता प्रशासकीय यंत्रणेव्दारे याची अंमलबजावनी व्हावी व निधी उपलब्ध करून द्यावा व लाभार्थ्यांना कसन्यास शेती मिळावी अशी अपेक्षा निवेदनात सौ संध्या रणवीर यांनी नमूद केले आहे.
