
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील रमेश इंगोले आणि त्यांच्या पत्नी सौ रेखाताई रमेश इंगोले मागील अकरा वर्षापूर्वी दिनांक 22/7/2023 रोजी पुल पार करत असताना पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे पुरातून वाहून गेले होते.आणि त्यात दोन्ही पती पत्नीचा मृत्यू झाला होता.त्यावेळी तत्कालीन खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा पुल उंच बांधणे गरजेचे असून हा विषय ताबडतोब मार्गी लावून पुल बांधण्याचे आश्वासन दिले अशातच 2014 मध्ये लागलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विद्यमान आमदारांना पसंती दिली.आणि आता नवनिर्वाचित आमदार आपली कामे पूर्ण करतील अशी अपेक्षा करत असतांनाच मतदारांचा अपेक्षा भंग झाला.परंतु त्या पुलाकडे आतापर्यंत साधं ढुंकूनही बघितले नाही.या घटनेला आता अकरा वर्षे पूर्ण झाली तरी पण तेथील स्थानिक जाता येता या पुलाकडे उदासिनतेने पाहत पाहत जातात. सध्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ अशोक उईके हे विद्यमान आमदार असून त्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात,केंद्रात असतांना हा पुलाचा प्रश्न सुटू नये ही मात्र लोकशाहीची थट्टाच म्हणावे लागेल.अशातच तत्कालीन खासदार ह्या आता सुद्धा विद्यमान खासदार असताना हा साधा प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठराव्या हे तर दुर्दवीपणाचे लक्षण असून अशा या पावसाळ्यात त्या वाहून गेलेल्या इंगोले दाम्पत्याची आणि त्या दिलेल्या पोकळ आश्वासनाची आठवण येत असल्याचे सदर प्रतिनिधीजवळ पिंपरीवासियांनी सांगितले.
