
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
एकीकडे प्रचंड नैसर्गिक आपत्ती असताना दुसरीकडे शेतकरी मात्र कुणाच्या आशेवर जगवा ह्या प्रश्नाच्या गायत्री गिरक्या मारत आहे, तोंडाशी आलेला घास अचानक पणे निघून गेल्याने शेतकऱ्यांची आता मोठी पंचाईत निर्माण झाली आहे, विशेष करून विदर्भाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सोयाबीन, कापुस पिकाची पेरणी मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी केली परंतु अचानकपणे ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने शेतकरी मात्र हैराण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी आता सर्वत्र दिसणारे पाणीच पाणी शेवटी काय देऊन गेलं हे कळायला मार्ग नाही, राजकीय क्षेत्रातील नेत्यांना निवेदनाच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचे तारतम्य नसल्याने वैदर्भीय मातीमध्ये असणारा शेतकरी मात्र चिंतातुर झाला आहे, एकीकडे 2007मध्ये ओला दुष्काळाचे सावट यवतमाळ जिल्ह्यावर पडले असताना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा दौरा मोठ्या शिताफीने घडून आणला होता, तेव्हा यवतमाळच्या विमानतळावर शेतकऱ्यांची भेट घालून कोट्यवधी रुपयाचे रुपयाचा निधी त्यांनी जिल्ह्याच्या विविध कामासाठी उपयोगात आणला त्याची आठवण आली आहे, असे असताना अवघ्या दहा अकरा दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाचे धो-धो थैमान माजले त्यामुळे शेतकरी अस्ताव्यस्त झालेला आहे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी दुसरीकडे मुलाबाळांचे शिक्षण तिसरीकडेच शेतीसाठी काढलेले कर्ज आणि उसनवाडी घेऊन सुद्धा तोंडचा घास पळवून पावसाने नेला त्यामुळे ज्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्याने आपली आस धरली होती त्यांनीच वेळेवर दगा दिल्याने ही परिस्थिती राळेगाव तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली त्यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत विदारक काळ असून याला जबाबदार कोण हा प्रतिप्रश्न विचारला जात आहे,
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संदीपानजी भुमरे यांनी नुकताच दौरा केला यावेळी सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची टीमसोबत होते परंतु त्यानंतर दिलेल्या कागदांचे काय होईल याची चिंता सुद्धा शेतकऱ्यांना तेवढीच लागली आहे त्यामुळे राळेगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना थेट निवेदन पाठवण्याची तयारी सुरू केली असून यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे राळेगाव कळंब तालुका तालुक्यांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून या शेतकऱ्यांना आता पावसाने सुद्धा सळो कि पळो करून सोडले आहे त्यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळच ठरेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे घरा दारा मध्ये असणारा होता नव्हता पैसा शेतीसाठी लावला गेला सोनं गहाण ठेवले गेले परंतु शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याने आता सरकार मायबाप काय करतात याकडे सर्व शेतकरी राजाचे लक्ष लागले आहे
राळेगाव तालुक्यातील असणारा पांढरे पेशी पुढारी वर्ग शेतकऱ्यांकडे कधी लक्ष देईल हे मात्र काही सांगता येत नाही मोठमोठे कार्यक्रम घेऊन आणि पार्ट्या आणि मेजवान्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार नाही परंतु बांधावर दोन शेतकऱ्यांची समस्या समजून घेणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधींनी फक्त हातामध्ये सोयाबीन व कापुस घेऊन फोटो स्टेशन केलं आणि वर्तमानपत्रांमध्ये,सोसिअल मीडियावर मोठमोठ्या बातम्यांच्या हेडींग सुद्धा झाल्या त्यानंतर काय हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना अजूनही पडला आहे याबाबत आता शेवटी सरकारनेच काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे
