
सहसंपादक: रामभाऊ भोयर
स्थानिक आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव द्वारा आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पठाण -47 विरुद्ध मॉर्निंग पार्क ग्रुप कळंब या संघामध्ये लढत होऊन पठाण -47 संघाने विजय संपादन करून RPL- चषक 2026 पटकाविले. द्वितीय मॉर्निंग पार्क ग्रुप कळंब, तृतीय साईराम बिल्डिंग मटेरियल स्पार्टन बाभुळगाव, चतुर्थ आदर्श राळेगाव या संघाने पटकाविले. या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीज राजवाणी फॅशन मोहदा संघांचा सैय्यद फरहान, अंतिम सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच पठाण-47 चा आतिफ, उत्कृष्ट फलंदाज फरकाडे-11 संघ बाभुळगाव चा गणेश मडावी, उत्कृष्ट गोलंदाज पठाण-47 चा नसीम, लगातार तीन चेंडूवर तीन षटकार फरकाडे-11 बाभुळगाव चा सुरज झिटे, उत्कृष्ट यष्टीरक्षक पठाण -47 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मॉर्निंग पार्क कळंब चा अनुज तर या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल चा पुरस्कार विजेता तनुजा मोबाईल चा चंदन नगराळे हा ठरला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे माजी शालेय तथा क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके यांचे शुभहस्ते पार पडला यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले जो खेळाडू स्वतःसाठी न खेळता संघांसाठी खेळतो तो खेळाडू आपल्या संघाला विजयी करण्याचा सच्चा प्रयत्न करतो, संघामध्ये एकता असली पाहिजे, पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की खेळाच्या मैदानावर जातीपतीचा भेद नष्ट होतो त्यामुळे समाजाने खेळाला प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी मंचावर राळेगाव पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक योगेश दंदे, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, भाजपा शहर अध्यक्ष शुभम मुके, भरत ठुणे, शशिकांत धुमाळ नगरसेवक, सुधाकर गेडाम, सुरेश ठाकूर, संदीप पेंदोर, चंदुभाऊ चांदोरे, पत्रकार गजानन अक्कलवार, महेश शेंडे, महेश भोयर, लियाकत अली, अशोक भागवत, अमिर पठाण, प्रदिप ठुणे, प्रविण टिप्रमवार उपस्थित होते.
कार्यकर्माचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव फिरोज लाखाणी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
