
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील करंजी (सोना माता) येथे बैलाच्या अंगावर वीज पडून दोन बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे दिनांक 18 एप्रिल च्या मध्यरात्री विजाच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली होती. सदर करंजी येथील शेतकरी गजानन निखाडे शेत सर्वे नंबर 49 मध्ये नेहमीप्रमाणे आपले दोन बैल बांधून होते 18 एप्रिल च्या मध्यरात्री विजेच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे दोन्ही बैल झाडाला बांधून असता त्यांच्या अंगावर वीज पडून दोन्ही बैल जागीच ठार झाले आहे. यामध्ये या शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची तक्रार महसूल विभाग, पशुसंवर्धन व पोलीस विभाग यांच्याकडे देण्यात आली असून सदर वीज पडून मरण पावलेल्या बैलांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करंजी येथील शेतकरी गजानन निखाडे यांनी केली आहे.
