
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यशवंतराव चव्हाण ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कार राळेगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी शंकर रमेश मुजमुले यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सन २०२२-२३ या वर्षाचा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
हा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे दिं. २७ मे २०२५ रोज मंगळवार ला पार पडला आहे.
पंचायतराज अभियान राज्यस्तरावर राबविण्यात ग्रामपंचायत अधिकारी शंकर मुजमुले यांनी महत्त्वाचे योगदान दिल्यामुळे त्यांना २०२२-२३ चा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती राळेगाव मधील कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मुजमुले यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला महामहिम राज्यपाल राधाकृष्णन मा. ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे, राज्यमंत्री ग्रामविकास मा.योगेश कदम, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा. एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंकर रमेश मूजमुले व त्यांच्या पत्नी सौ.पूजा शंकर मूजमुले यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले असून शंकर रमेश मुजमुले राळेगाव पंचायत समिती मधील कर्तव्यदक्ष उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
