
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
शासनाची एजन्सी असलेल्या नाफेड कडून हमीभावामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू आहेत पण यावर्षी या सोयाबीनच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून आजपर्यंत अत्यल्प खरेदी नाफेड मार्फत सोयाबीनची झालेली आहेत तालुक्यात यावर्षी नाफेड कडे केवळ 375 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 27 नोव्हेंबर पर्यंत नाफ़ेडणे 369 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहेत गेल्या वर्षीचा विचार केल्यास गेल्यावर्षी 1075 शेतकऱ्यांनी नाफेड कडे सोयाबीनच्या खरेदीसाठी अर्ज केले होते तर नाफेडणे 15735 क्विंटल सोयाबीनची खरेदी केलेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी कडे पाठ फिरवली असून अत्यल्प खरेदी नाफेडणे केलेली आहे सोयाबीनचा हमीभाव हा 5328 रुपये आहेत व बाहेर मार्केटला अजूनही 4000 रुपयांच्या जवळपास सोयाबीनला दर मिळत आहे दिवाळीच्या तोंडावर तर शेतकऱ्यांचे सोयाबीन हे तीन हजार रुपये क्विंटलला विकले गेले सोयाबीनचा हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये अजूनही बरीच तफावत आहेत सोयाबीनची क्लिष्ट असलेली ऑनलाइन प्रक्रिया तसेच नाफेडला पाहिजे असलेले उच्च प्रतीचे सोयाबीन यावर्षी झालेलं अत्यल्प उत्पादन आदि गोष्टीमुळे यावर्षी नाफेडच्या खरेदी कडे शेतकरी फिरकले नाहीत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तसेच विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहावे लागत आहे तसेच नाफेडकडे सोयाबीन विकताना त्यामध्ये ओलावा पाहिला जातो यावर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन हे चांगले नव्हते त्यात ओलसरपणा जास्त होता त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन निघाल्याबरोबर ते विकले तसेच दिवाळीच्या तोंडावरती पैशाची अडचण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी तेव्हाच सोयाबीन विकले परिणामी शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीनच नसल्याने यावर्षी शेतकरी नाफेडकडे वळलेच नाही प्रतिक्रिया मिलिंद इंगोले सभापती खरेदी-विक्री संघ नाफेडला अतिशय उच्च प्रतीचे सोयाबीन पाहिजे यावर्षी सोयाबीन काढताना पाऊस आल्यामुळे काही शेतकऱ्याकडेच उच्च प्रतीचे सोयाबीन आहे नाफेडने उच्च प्रतीच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा सोबतच नाफेडणे सोयाबीनची प्रतवारी करून खरेदी करावि आणि कमी प्रतीच्या सोयाबीनला त्याच्या गुणवत्तेनुसार भाव द्यावा पण नाफेडणे सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतले जाईल शेतकरीच हलक्या दर्जाचे सोयाबीन नाफेडकडे विक्रीसाठी आणत नाही जानराव गिरी शेतकरी सोयाबीन काढते वेळेस यावर्षी पाऊस होता त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन निघाले नाही तसेच शासनाने सोयाबीनच्या खरेदीसाठी बराच विलंब केला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले सोयाबीनच्या खरेदीमध्ये शासनाने थोडे लवचिक धोरण अवलंबिल्यास नाफेडच्या खरेदीचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल सचिन हुरकुंडे अध्यक्ष राळेगाव ग्राविका यावर्षी सोयाबीनचे उत्पादन हे अतिशय कमी झाले. तसेच निघालेल्या सोयाबीनची प्रत ही चांगली नव्हती तसेच सोयाबीनमध्ये ओलावा सुद्धा होता त्यामुळे मी माझ्याकडील सोयाबीन दिवाळीमध्ये विकले याशिवाय शासनाने वेळेवर नाफेडची खरेदी सुरू केली असती तर सोयाबीनच्या विक्रीमध्ये माझे जे नुकसान झाले आहेत ते झाले नसते
