
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
सावरखेड येथील वार्ड क्र.1 मधील अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली ,गावातील सर्व बालक वर्ग व माता या कार्यक्रमाला हजर होत्या,सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षणा बद्दल योगदान व त्यांचे कार्य या बद्दल या कार्यक्रमात माहिती देण्यात आली,मुलीला शिक्षण दिले तर ती सुद्धा देशाच्या विकासात योगदान देऊ शकते असे विचार प्रकट करण्यात आले.सर्व मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशात हजर होत्या,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका संगीताताई मोहद ,निर्मलाताई मेश्राम,कविता लोणार यांनी सहकार्य केले.
