
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील सुप्रसिद्ध मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथील नुकत्याच जाहीर झालेल्या एच. एस. सी. बोर्डाचा निकालात ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज बरडगाव ता. राळेगाव जी. यवतमाळ येथील 100%निकाल लागला असून यंदाही कॉलेज च्या विद्यार्थ्यानी तालुक्यातून टॉपर येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेतून कु. तपस्या बोथरा 84.16%,कु. गौरी वर्मा 82.66%,कु. स्नेहा मुथा 81.5%,कु. यशस्वी रोहने 80.5%,कु. राधिका पिंपरे 79.33%,कु. खुशी दुबे 79.66,वेदंती राव 79%मिळवून यशाची परंपरा कायम ठेवत यश प्राप्त केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. संतोष कोकुलवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. शितल बल्लेवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यानी त्यांच्या यशाचे श्रेय कॉलेजच्या सर्व शिक्षकांना व पालकांना दिले.
