द बर्निंग कंटेनर उभ्या कंटेनर ने घेतला पेट,वडकी येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

सोमवार दि १४ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावरील वडकी गावाजवळ असलेल्या सिंह धाब्याजवळ उभ्या असलेल्या एका ट्रक कंटेनर ने पेट घेतला.या आगीत ट्रक मालकाचे समोरील कॅबिन जळून यात सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले,
सविस्तर माहिती अशी की
ट्रक क्र एच आर ३८ डब्ल्यू २८६९ या क्रमांकाचा दिल्ली वरून फ्रीज चा माल घेऊन कोचीन येथे जात होता ट्रक चालक मुबारक खान वय २८ वर्ष याला भूक लागल्याने त्याने आपला ट्रक वडकी गावाजवळ असलेल्या सिंह ढाब्याजवल उभा करून तो जेवण बनवीत होता,त्यातच काही वेळात शॉर्टसर्किट झाल्याने ट्रक मधील समोरील कॅबिन भागात अचानक आगीने पेट घेतला,व आगीचा भडका उडाला,ही बाब
नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी धाव घेत पाण्याचे स्रोताने आग आटोक्यात आणली,
या आगीत ट्रकच्या समोरील कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीच जीवितहानी झाली नाही,
घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे पी,एस आय मंगेश भोंगाडे सह पोलीस बांधव दाखल होऊन आग नियंत्रणात आणली.